२२ भाविकांचे रक्तदान : अमृत महोत्सव आज सांगता

उस्मानाबाद / प्रतिनिधी- :-

जगाच्या कल्याणाची भूमिका प्रत्येक संताने मांडली आहे. दया, प्रेम, क्षमा आणि शांतीसह भूतदया शिकवणारा संत विचार सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे. संताना परिवर्तन हवे होते. पण त्यासाठी त्यांना शांतीचा मार्ग महत्त्वाचा वाटत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या अभंग, उपदेश आणि शिकवणीतून विषमतेवर प्रहार केला आहे. म्हणून संत साहित्यात बंड आणि विद्रोह सुध्दा आढळतो. त्यामुळे हिंसा विरोध आणि विषमतेवर प्रहार हे संत विचारांचे मूळ असल्याचे पदोपदी जाणवते, असे प्रतिपादन हभप.उल्हास सुर्यवंशी महाराज यांनी केले.

तालुक्यातील श्री.क्षेत्र तेर येथील संतधाम परिसरात हभप.गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे-पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अमृत महोत्सवात हभप.उल्हास सुर्यवंशी महाराज यांचे कीर्तन झाले. तेव्हा बोलत होते.

यावेळी संतपीठावर हभप.शाम महाराज, हभप.उल्हास महाराज,  हभप.अविनाश गरड, हभप.संदिपान येवले महाराज, हभप.दत्तात्रय फुलारी महाराज, सोनु शिंगाडे, प्रदीप पवार,

 हभप.गणेश सोनवणे महाराज, हभप.नाईक महाराज ब्रांदेकर,  हभप.गणेश बडगे महाराज, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे महापौर मदन नाईक, विनायक पुंड, नाना लोखंडे, सुनिल देवरे, रोहिजा भडकर, हभप.अशोक महाराज आपेगांवकर, प्रविण पंडित, हभप.महादेव महाराज बोराडे, हभप.जगन्नाथ महाराज देशमुख, हभप.नाना महाराज कदम, हभप.नारायण उत्तरेश्वर, हभप.रघुनंदन महाराज, नायगावकर बाबा, बप्पा शेळके, नामदेव उगिले, रामकृष्ण शिंदे-पाटील, पांडुरंग थोडसरे, किरण सुर्यवंशी, दिनेश जाधव, विवेकानंद शिंदे-पाटील, शरद जाधव, आदित्य जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना हभप.उल्हास महाराज म्हणाले की, जागतिकीकरणाने माणसांमध्ये तुटलेपणाची भावना आली आहे. एकमेकांप्रती ओलावा कमी झाला आहे. आत्मकेंद्री आणि भोगवादी समाजात स्वस्थ, सदाचार आणि नीतीमुल्यांची रुजवणूक करण्यासाठी संतांचे वाड्‌मय महत्वाचे आहे. त्यामुळे वाणीत गोडवा ठेवला पाहिजे. हा गोडवा गुरुवर्य हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांनी जपला म्हणून हा सोहळा आहे. म्हणून ते अवितरपणे वारकरी संप्रदायाची निष्काम सेवा करीत आहेत.

या अमृत सोहळ्याच्या दुपार सत्रात वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप.आत्माराम बाबा शास्त्री, विश्वस्त हभप.ज्ञानेश्वर माऊली कदम, हभप.रघुनाथ महाराज देवबप्पा यांची ओघवत्या भाषेत रसाळपूर्ण प्रवचने झाले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून उस्मानाबाद येथील सह्याद्री बल्ड बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात २२ भाविक-भक्तांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सह्याद्री बल्ड बँकेच्या अलकेश पोहरेगावकर, अशोक गायकवाड, अनुजा नाईकवाडी, किरण जाधव, केतन घोडके, मनिषा घोलकर, अंकिता धोत्रे,

भिम मुलक्कनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

चार दिवसीय या अमृत महोत्सवात ढोकी उपकेंद्रातील १०८ या शासकीय आपत्कालीन रुग्णवाहिकेचे डॉ.नंदकुमार गोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पायलट विजयकुमार मजगे, सुनिल सगर, तेर केंद्राच्या आरोग्य सेविका विजया लोहार आणि आशा सेविका संगीता डोलारे सहभागी हजारो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत आहे. त्यामुळे सर्व भाविकांना प्राथमिक उपचार वेळेवर मिळत आहेत.

दरम्यान, चार दिवसीय अमृत महोत्सवात आज सकाळी अभिष्टचिंतन मूर्ती हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांचे संतपूजन आणि तुला होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध हभप.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. त्यासाठी वारकरी संप्रदायातले अनेक नांमकित कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, गडकरी, फडकरी, गायक, वाद्यवृंद, वारकरी, टाळकरी आणि भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


भक्तीला जात नसते - हभप.संजय पाचपोर महाराज

वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यम प्रभावी झाले आहे. तिथे काही व्यक्ती मुक्तपणे लिहितात. मात्र, त्या लिहिण्याला अनेकदा धर्म, जात, विचारधारेच्या मर्यादा असतात. वरवर छान दिसणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगात डोकावून पाहिले असता, वेगळीच परिस्थिती नजरेस पडते. त्यामुळे संतानाही जातीय चौकटीतून पाहाणारे लोक वाढत आहेत. परंतु विश्वाच्या कल्याणाचं मागणं मागणाऱ्या संतांना जातीचे लेबल लावणे चुकीचे आहे. कारण, अध्यात्म किंवा भक्तीला जात नसते, असे स्पष्ट मत विदर्भरत्न रामायणाचार्य हभप.संजय महाराज पाचपोर यांनी आपल्या हरिकीर्तनातून मांडले. 


...तर रुग्णसेवेत पांडुरंग भेटतो - डॉ.नंदकुमार गोरे

 भाविक-भक्तांना आम्ही गेली चार दिवस प्राथमिक औषधोपचार देत आहोत. त्यामुळे रुग्ण बरा झाल्याचे येऊन सांगतात. प्रेमाने बोलतात. त्यामुळे केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही समृध्द करणारा हा अनुभव खूप गोड आहे. रुग्णसेवेसह मोठमोठ्या महाराजांनी अर्थपूर्ण कीर्तने ऐकायला मिळाली. त्यामुळे रुग्णसेवेत पांडूरंग भेटतो, असे ढोकी उपकेंद्र १०८ रुग्णवाहिकेचे आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकारी डॉ.नंदकुमार गोरे यांनी प्रसार-माध्यमांशी बोलताना सांगितले.

 
Top