उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यान्वित विविध शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजाची सध्य:स्थिती सर्वसामान्य जनतेला अवगत व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांनी जिल्हयातील इलेक्टॉनिक्स (न्यूज चॅनेल्स) व प्रिंट मिडीया (दैनिक वर्तमान पत्रे) यांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करुन द्यावी, अशी काही पत्रकार बांधवांनी विनंती केली आहे.

  त्यानुसार जिल्हयातील सर्व प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स (न्यूज चॅनेल्स) व प्रिंट मिडीया (दैनिक वर्तमान पत्रे) यांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्यासोबत खुली चर्चा करण्यासाठी आठवडयातील दर सोमवारी सायंकाळी 6.00 वा.ही वेळ निश्चित करून देण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहूल गुप्ता यांनी कळविले आहे.


 
Top