तुळजापूर/ प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मंदीरात बुधवार दि. ७रोजी श्री दत्तात्रेय जयंती पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री तुळजाभवानी मंदीरात अनादीकालापासुन श्रीदत्त जयंती सोहळा साजरा करण्याची प्रथापरंपरा आहे. या पार्श्वभूमीवर
श्रीतुळजाभवानी मंदीरातील उपदेवता असलेल्या श्रीदत्त मंदीरातील मुर्तीस सकाळी अभिषेक घालण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर देविचे महंत वाकोजीबुवा व हमरोजी यांच्या हस्ते दुपारी श्रीदत्त मुर्तीचे पुजन करुन आरती करण्यात आली नंतर श्रीदत्त हे विष्णू अवतार त्यांची पुजा देविंजींच्या महंताच्या हस्ते करण्यात आल्यानंतर श्रीदत्तात्रेयांची छोटी मुर्ती पाळण्यात ठेवून श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम, नाना चोपदार, बब्रुवान पलंगे, सुहास भय्ये, विकास परमेश्वर, नागेश परमेश्वर , रविचंद्र गायकवाड सह भाविक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.