तुळजापूर /प्रतिनिधी- 

 पौष महिन्यात असणाऱ्या श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ उत्सवात  श्रीतुळजाभवानी शांकभरी सांस्कृतिक   महोत्सव चालू करावा,  शहरात अनेक वर्षापासून असलेली  नाटयग्रहाच्या मागणीची पुर्तता करा या मागणीचे   निवेदन  आमदार राणाजगजितसिंहजी पाटील   यांना देण्यात आले. 

त्यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी सकारात्मक विचार करुन नाटयग्रह आधुनिक पद्धतीने बनवू असा शब्द  दिला. त्यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नितीन  काळे  , तालुका अध्यक्ष संतोष दादा बोबडे,सरचिटणीस शिवाजी बोधले जिल्हा समन्वयक मजूर फेडरेशन अध्यक्ष नारायण भाऊ नन्नवरे,भाजयुमो तालुका अध्यक्ष आनंद दादा कंदले,शहर अध्यक्ष शांताराम  पेंदे, राजेश  शिंदे,महेश धुमाळ, सचिन घोडके,दिनेश क्षीरसागर, राजेश चोपदार,प्रशांत भोसले,सुहास साखरे,अनिकेत क्षीरसागर, प्रशांत शेटे आदी नाट्य कलाकरांची उपस्थिती होती. 


 
Top