तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर हे रेल्वे मार्गावर येण्यासाठी  गेली अनेक वर्ष   चालु असलेल्या संघर्षाला अखेर  सोलापूर- तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्गासाठी अखेर दि .२९ नोव्हेंबर राज्य मंत्रिमंडळाने ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधीचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिल्याने पुर्ण विराम मिळाला. या निर्णयामुळे अखेर महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेले तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गावर येण्याचा मार्ग सुकर  झाला.

  राज्य सरकारकडून ५०% निधी  देण्यास मान्यता मिळाली.  तुळजाभवानी तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याची मागणी सन १९३५ वर्षापासून होती सन १९०५ मध्ये ह्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. सन २०१० मध्ये दुसऱ्या वेळी पुन्हा सर्वेक्षण केले गेले त्यासंदर्भात तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती तुळजापूरने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दि.२०/०६/२०१४ रोजी निवेदन दिले. दि.०८/१२/२०१५ रोजी प्रधानमंत्री दिल्ली कार्यालयात तुळजाभवानी संघर्ष समिती प्रत्यक्ष जाऊन निवेदन दिले. विशेष म्हणजे केंद्र शासनाने यापूर्वीच या कामासाठी ३२कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ मध्ये या रेल्वे मार्गास मंजुरी दिली व भूमिपूजनही केले. संयुक्त मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पात साठी ३२ गावातील १३७५ एकर जमीन संपादन ८४.४४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग एकूण ९०४ कोटी ९२ लाख खर्च, तीन मोठे उड्डाणपूल, ११०छोटे पूल, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव मार्गावर दहा रेल्वे स्थानके असतील. हा प्रकल्पात ५०% वाटा केंद्र सरकारचा व ५०% वाटा राज्य सरकारचा आहे. तसेच चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या रेल्वे प्रकल्पामुळे मराठवाड्यातून सोलापूर मार्ग दक्षिण भारतात मार्ग होणार आहे.   तुळजापूर दर्शनासाठी लाखो भाविकांचा लाभ होणार आहे. जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यटन या क्षेत्राला चालना मिळेल.या रेल्वे मार्गासाठी  विशेषत: सर्वपक्षीय तुळजाभवानी रेल्वे संघर्ष यांनी मोठा संघर्ष केला.

बबन गावडे यांनी तर तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गावर यावे या मागणी साठी मराठवाडातील सोलापूर जिल्हयातील खासदारांच घरासमोर  प्रतिकात्मक रेल्वे नेवुन आंदोलन केले या आंदोलनाला राजकिय जनादार अपेक्षित मिळाला नाही तरीहीविविध सामाजिक तसेच पञकार संघटना यांनी आंदोलन सातत्याने केल्याने आज तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गाचे स्वप्न पुर्ण झाले. गोव्याचे मंञी श्रीपाद नाईक  यांनी ही या संघर्षात मोठे योगदान दिले होते हे विशेष 


 
Top