उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राजकीय सुडबुद्धीने शहरातील विविध विकासकामांसह उद्यानाच्या कामाला शिंदे-फडणवीस स्थगिती दिल्याप्रकरणी आमरण उपोषणा आंदोलनाची दुसऱ्या दिवशीही (दि.22) प्रशासनाने दखल घेतली नाही. तर शहरातील मुला-मुलींनी जिल्हाधिकार्‍यांना उद्यानाच्या मागणीसाठी निवेदन देऊन शिवसेनेच्या आंदोलनाला पाठींबा दिला. लवकरात लवकर उद्यान तयार करा अशी मागणी यावेळी मुला-मुलींनी थेट जिल्हाधिकार्‍यांसमोर केली.

 तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालात उस्मानाबाद नगर परिषदेमार्फत शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आलेली होती. या कामांना राजकीय द्वेषापोटी शिंदे-फडणवीस सरकार व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे सेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास घाडगे पाटील, मा.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, पंकज पाटील, अजय नाईकवाडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

काका आमच्यासाठी उदयान तयार कराना

 गुरुवारी (दि.22) शहरातील बाळ-गोपाळांच्या वतीने शहरातील उद्याने सुरु करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आम्हाला खेळण्या-बागडण्यासाठी शहरात एकही उद्यान नाही. त्यामुळ लवकरात लवकर उद्यान सुरु करावे अशी मागणी यावेळी मुला-मुलींनी केली. महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही शिवसेनेच्या या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

 
Top