उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हा क्रॉस-कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन १६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. हि स्पर्धा श्री. तुळजाभवानी क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे होणार आहेत. यात पहिल्या ३ पात्रता धारण करणाऱ्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड होणार आहे.

एकूण ०4 वयोगटात हि स्पर्धा होणार आहे. राज्य स्पर्धेकरिता १६,१८,२० व खुला महिला - पुरुष या वयोगटातील स्पर्धक राज्य स्पर्धेकरिता पाठविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश करताना ओळखपत्र, आधारकार्डसह  ग्रामपंचायत,नगरपरिषद,नगरपालिका यांच्याद्वारे जरी करण्यात आलेला जन्म तारखेचा दाखला तसेच AFI UID असणे अनिवार्य आहे.जिल्हा संघ निवड समिती प्रमुख राजेंद्र सोलनकर,राजेश बिलकुले,संजय कोथळीकर,योगेश उपलकर,माउली भुतेकर तर तांत्रिक समिती मध्ये सचिन पाटील,सुरेंद्र वाले,अजिंक्य वराळे,मुनीर शेख,प्रशांत बोराडे,अनिल भोसले,रवीराज घाडगे आणि बक्षीस वितरण मध्ये संजय कोथळीकर,रोहित सुरवसे  इत्यादी आहेत. दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता उस्मानाबाद येथील तुळजाभवानी मैदानावर स्पर्धेला सुरुवात  करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री.योगेश थोरबोले यांनी दिली. या जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत आदिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री भरत जगताप यांनी केले आहे अधिक माहितीसाठी राजेंद्र सोलनकर,माउली भुतेकर,योगेश थोरबोले(९८६०६०९०५६)यांच्याशी साधावा.  

 
Top