उस्मानाबाद   / प्रतिनिधी

तालुक्यातील चिलवडी रविवाशी व पुण्यातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ रत्नदीप जाधव यांच्या जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्व आधार गतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पातील मुलींना हायजेनिक किट आणि गणवेश वाटप करण्यात आला.

यावेळी जगदंबा ट्रस्टच्या वतीने सदरील निवासी प्रकल्पातील 111 विद्यार्थिनींना गणवेश देण्यात आले. दिवाळीत ट्रस्टच्या वतीने हायजेनिक किट (ब्रश, पेस्ट,साबण, कंगवा, शांपू, तेल बॉटल) आदींचे वाटप करण्यात आले. जगदंब ट्रस्टच्या वतीने यापूर्वी कोविड काळात उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात 70 ऑक्सिजन कॉन्स्टेटर्स, 20 व्हील चेअर, 12 स्ट्रेचर, 2200 जीवरक्षक इंजेक्शन आदींची मदत करण्यात आली होती. तसेच चिंचवड येथील मुकबधीर शाळेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

गणवेश वाटप कार्यक्रमास स्व आधार प्रकल्पाचे सचिव एस एन चव्हाण, ट्रस्टचे उपाध्यक्ष बाजीराव जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रत्नदीप जाधव, ऍड मकरंद कठारे, ट्रस्टच्या सदस्य विना पाटील, अमोल यादव, सूरज जाधव, अजय जाधव, संजय आडगळे आदींची उपस्थिती होती.


 
Top