तुळजापुर  / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील किलज येथील मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट अणदूर संचलित श्री सिध्देश्वर विद्यालय येथील १५ विध्यार्थ्यांना समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत सेस योजनेतून १५ सायकली मंजूर करण्यात आल्या होत्या.येथील एकुण ४ तांड्यावरील (सिमदरा,मारखोरी, गवंडी,आमराई) येथील विद्यार्थी हे शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी दुर हुन आपल्या तांड्यावरून पायी येत आहेत.  ही अडचण लक्षात घेऊन पायी चालत येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.सुनील चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक निळोबा काळे,यांच्या प्रयत्नांतून  सायकली मंजूर करण्यात आल्या होत्या.

 लाभार्थी विध्यार्थ्यांना सायकलींचे वाटप माजी पंचायत समिती सदस्य.खंडूराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य.सिधलिंग स्वामी,शाळेचे मुख्याध्यापक निळोबा काळे यांच्या सह शाळेतील शिक्षक दयानंद येळकोटे,शिरीष गायकवाड, संजय घोगरे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात सायकलींचे पूजन करुन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय घोगरे यांनी केले. कार्यक्रमासाठी विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top