तुळजापुर  / प्रतिनिधी : - 

तुळजापूर -लातूर राष्ट्रीय महामार्गावर असणा-या काक्रंबागावा  पुढे असणाऱ्या  महामार्ग रस्ता दुभाजक  चक्क  फोडला असुन यामुळे हा रस्ता सध्या धोकादायक  बनला आहे पण याची दखल कुणीही घेत नसल्याने  रस्ता दुभाजक फोडणा-यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर हा तुळजापूर तालुक्यातुन जातो काक्रंबा गावचा पुढे ऐक ते दीड किलोमीटर अंतरावर महामार्गरस्ता वर मधोमध  असणारा रस्ता दुभाजक आठ ते दहा फुट  फोडल्याने त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळीपायी , दुचाकी चारचाकी तुन या फोडलेल्या दुभाजका मधुन दुसऱ्या बाजुला जात आहेत त्यामुळे  दोन्ही बाजुने वेगाने  येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक दाबावे लागत असल्याने येथे सातत्याने किरकोळ आपघात घडत आहेत सदरील रस्ता दुभाजक फोडण्याचे कारण काय धाबे वाल्याने दोन्ही बाजूचे गिऱ्हाईक मिळावे म्हणून तर रस्ता फोडला नाही यासह अनेक बाबीची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी व या संबंधित राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा यंञणेतील आधिकारी या प्रकरणी का  चुप्पी साधत आहे याचीही चौकशी करावी अशी मागणी होत आहे. 


 
Top