परंडा/ प्रतिनिधी-
परंडा तालुक्यातील अनाळा येथे बुधवार दि.७ रोजी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद व युरोपियन युनियन यांच्या वतीने महिला मेळावा येथील शासकिय गोदामात घेण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सीमा सय्यद व प्रकल्प व्यवस्थापक योगेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .
या मेळाव्यात कृषी विभाग आत्मा अंतर्गत प्राप्त झालेले भाजीपाला बियाणे किट १०० महिलांना वाटप करण्यात आले.या मेळाव्या साठी अनाळा , मलकापूर , मुगांव , कार्ला , इनगोदा , रत्नापूर , चिंचपूर खु , ताकमोडवाडी , रोहकल , साकत बु , पिस्तमवाडी आदि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सीमा सय्यद यांनी संस्थेच्या कार्या विषयी अनमोल मार्गदर्शन केले . परंडा तालुक्यात पंधरा गावात संस्थेचे काम सुरु आहे . यामध्ये गांडुळ खत निर्मिती बेड , शेंद्रिय शेती , बायोगॅस उभारणी , विविध पिकांसाठी फवारणी साठी उर्वरा किट अल्प दरात उपलब्ध करुन दिले आहेत .बंदिस्तशेळी पालन , शेळी पालनाचे फायदे , शेळ्याना होणारे आजार व त्यावर उपचार , गोट किडस नर्सरी उभारणी, शेळ्यांसाठी पशुखादय तयार करणे , चाटण वीट , निम ऑईल तयार करणे , मसाला बोलस अशी विविध प्रकार चे पदार्थ तयार करून प्रत्येक गावातील पशुसखी शेळी पालन गटातील महिलांना उपलब्ध करून देत आहे . त्यामुळे शेळी पालक महिलाना त्याचा मोठा फायदा होत आहे. संस्थेच्या वतीने संबधित गावातील पशुसखीनी तीन हजार शेळ्यांना आतापर्यंत डिवर्मिग व लसीकरण केले आहे . कार्ला येथील पशुसखी कामिनी वरपे व चिंचपूर येथील पशुसखी प्रिया हजारे यांनी शेळ्यांवर उपचार केल्या नंतर काय फायदा होतो याविषयी मनोगत व्यकत केले. स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेच्या समन्वयक नौशाद शेख डिवर्मिग व लसीकरण यांचे फायदे शेळीपालक महिलांना सांगितले व संस्थेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.हा मेळावा स्वंयम शिक्षण प्रयोगसंस्थेचे संचालक उपमन्यु पाटील, जिल्हा समन्वयक किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी अजय हराळे, अन्नपूर्णा ठोसर, रेणूका सुर्वे, प्रिया हजारे ,आशा जगताप, कामिनी वरपे,शबाना सय्यद, शितल जाधव, राणी फरतडे, सारिका हिवरे, काजल खोत, आदी पशुसखी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उत्तम नियोजन तालुका समन्विका संस्थेच्या नौशाद शेख यांनी केले.