उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला हारपुष्प घालून प्रतिमेस आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.

याप्रसंगी समाज बांधवांस मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले की, संताजी जगनाडे महाराज यांनी तुकोबारायांच्या संगतीला राहुन तुकोबारायांचे अभंगांचे लिखाण करून त्यांचे संग्रह करून त्यांनी गाथा स्वरूपात समाजा समोर ज्ञानरत्न समाजाला दिले.याचा प्रसार समाजात होणं गरजेचं आहे.तरूण पिढी हि आध्यात्माकडे वळली तरच चांगल्या संस्कारात मुलं घडतील.

याप्रसंगी मा.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,मा.नगराध्यक्ष दतात्र्य बंडगर,मा.नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार,धनंजय शिंगाडे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय देशमुख,अँड खंडेराव चौरे, लक्ष्मण माने,बब्बलू शेख,सिध्दार्थ बनसोडे, नितिन शेरखाने,धनंजय राऊत,संजोग पवार,दिनेश बंडगर,शिवानंद कथले,वैभव हंचाटे,संतोष हंबीरे, सिध्देश्वर कोळी,आबासाहेब खोत,मुकेश नायगावकर,मा.नगसेवक तुषार निंबाळकर,विश्वंभर मैदाड,विनोद लावंड,लक्ष्मण निर्मळे,महादेव मेंगले,शिवलिंग होनखांबे,चंद्रकांत मेंगले,प्राचार्य गोरख देशमाने, प्रविण घोडके,गणेश घोडके,अजय शेटे,डि एन कोळी,दिपक नाईक.सातलिंग निर्मळे,यांच्यासह सर्व जातीधर्माचे जिल्हाध्यक्ष व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top