तुळजापूर/ प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेची ज्या भाविकांना सिंहासन पुजा करावयाची आहे त्यांनी प्रत्येक महिना सुरु होण्यापुर्वीच्या २५ तारखेस सांयकाळी ६ वाजेपासुन आँनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन मंदीर संस्थानने केले आहे
श्रीतुळजाभवानी मातेस भाविकांच्या श्रीखंड दहीदुध सिंहासन पुजा केल्या जातात यात सकाळी पाच व संध्याकाळी दोन सिंहासन पुजा करतात पुर्वी दहा दिवसाची सिंहासन आँनलाईन बुकींग केली जात होती आता एक महिनाभरा केली जाणार आहे .
विधी व न्याय विभाग तसेच पुरातत्त्व विभाग यांचेकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाचे अनुपालन करण्याच्या अधीन राहून श्री तुळजाभवानी देविजींची सिंहासन पुजा ऑनलाईन नोंदणी दिनांक २१/१०/२०२२ रोजीपासून सुरु करण्यात आलेली आहे . एक महिन्यासाठीची सिंहासन पुजा ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात येत आहे . सदर सिंहासन पुजा नोंदणीसाठी मंदिर संस्थानचे https://shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना नोंदणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे .