तुळजापूर / प्रतिनिधी - 

 तालुक्यातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायत च्या अटितटीच्या झालेल्या  निवडणुकीची  आज मतमोजणी होवुन यात अनेक प्रस्थापितांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला सर्वाधिक ग्रामपंचायत वर भाजपा प्रणित आघाडीने त्या खालोखाल  महाविकासआघाडी ने ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व निर्माण केले.

बहुतांशी ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीत पँनल मध्ये  विविध पक्षाचे कार्यकते असल्याने पक्षीय  बलाबल करणे  कठीण बनले आहे. महाविकासआघाडी त काँग्रेसने सर्वाधीक ग्रामपंचायत जिंकल्या.त्या खालोखाल शिवसेनेने यश संपादन केले.

तुळजापूर तालुक्यातील काटगाव   येथील ग्रामपंचायत काँग्रेस कडुन भाजपा  ने खेचुन घेतली तर भाजपा ताब्यात असलेल्या काटी ग्रामपंचायत काँग्रेस ने आपल्या कडे खेचुन घेतली.मोठ्या ग्रामपंचायत तीत कमी फरकाने सरपंच ग्रामपंचायत सदस्य निवडुन आले.या निवडणुकीत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात विजयी  झाल्याचे दिसुन आले.

या निवडणुकीत भाजपा एक नंबरवर, काँग्रेस दोन नंबरवर व नंतर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.मुख्यमंञी  एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला मतदारांनी धुडकावुन लावले. नळदुर्ग रोडवरील श्रीतुळजा भवानी  अभियांञीकी महाविद्यालयाचा स्पोर्ट हाँल मध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस आरंभ  झाला.  अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का बसला आहे. मतदारांनी प्रस्थापितांना घरी बसवुन नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकांत स्थानिक सर्वच आघाडी व पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई झाली.

तुळजापूर तालुक्यातील अंत्यत चुरशीचा झालेल्या काटी ग्रामपंचायत  सरपंच पद  निवडणुकीत भाजपा चा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला येथे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांच्या पत्नी आशा सुजित हंगरगेकर ६१मताने विजयी झाल्या. चिकुंद्रा  येथे काँग्रेस महाविकास आघाडीच्या कु . सोनाली बाबुराव कानडे सरपंच पदी विजयी . 9 सदस्या पैकी महायुतीचे 6, महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले. काक्रंबा येथे बदल होवुन खताळ देवगुंडे नेतृत्वाखाली  कालिदास खताळ सरपंच पदासाठी निवडुन आले येथे १३जागेपैकी महाविकासआघाडी ४अँड नागनाथ कानडे ४ भाजपा प्रणित अनिल बंडगर १, खताळ देवगुंड गट ३असे ग्रामपंचायत सदस्य  निवडुन आले. असुन एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी होवुन त्यात अनिता  मस्के या  विजयी झाले . 

काटगाव बहुजन विकास आघाडी 

 काटगाव येथे भाजपा उध्दव ठाकरे सेना प्रणित बहुजन विकास आघाडी पँनलचे अशोक दगडू माळी हे सरपंच पदासाठी १७०मताने विजयी झाले.येथे बहुजन विकास आघाडीला ५व विरोधकांना ८जागा मिळाल्या.

 केशगाव येथे बहुजन विकास आघाडीचे सरपंच पदासाठी  मल्लीनाथ गावडे हे सहा मताने विजयी झाले. येथे बहुजनविकास आघाडीला सहा व विरोधकांना तीन जागा मिळाल्या. मुस्लीम बहुल  असलेल्या निलेगाव येथे सरपंच पदाचा निवडणुकीत   अप्पु जमादार हे दोन मुस्लीम उमेदवारांना पराभुत करुन निवडुन आले. देवसिंगातुळ येथे भगवान पाटील पँनलचे सरपंच पदाचे उमेदवार पाटील विजयी झाले. पाटील गटाला  तीन व राजअहमद पठाण गटाला ४ जागा मिळाल्या. 

 आपसिंगा येथे  सरपंच पदाचा निवडणुकीत अजित अभिमान्यु क्षिरसागर हे विजयी झाले येथे मिरा विजय क्षिरसागर व रतनबाई गुलाबराव जाधव  या दोन महिला बिनविरोधी विजयी  झाल्या होत्या. 

 सावरगाव येथे   सरपंचपदी  सुनिता राजकुमार पाटील निवडुन आल्या  या  संतोष बोबडे राजकुमार पाटील, रामेश्वर तोडकरी यांच्या नेतृत्वाखालील नागनाथ महाराज पँनल सरपंच पदासह १३चा १३जागा जिंकुन विजयी झाले.

 देवसिंगातुळ येथे महालक्ष्मी महाविकासआघाडीचे माजी पंस सदस्य दत्ता मस्के हे सरपंच पदी निवडुन आले.  येथे पाच सदस्यांची  बिनविरोध निवडुणुक होवुन तीन ची आज मतमोजणी झाली.

 माळुंब्रात जयजवान जय किसान  पँनलच्या सदस्य पदाचा नऊच्या नऊ जागा आल्या असुन   सुरेखा नागनाथ सुतार सरपंच पदासाठी  विजयी झाल्या. 

 सांगवी काटी  ग्रामपंचायत सरपंच पदासाठी   अमोल शंकरराव पाटील विजयी झाले.,

 वागदरीत जाबाई शिवाजाराव मिटकरी विजयी पँनल, हंगरगा तुळ येथे तुळजाई ग्रामविकास पॅनेल चे   रवि जगन्नाथ सिरसट हे  विजयी झाले.  मुर्टा  येथे भाजपा माजी तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे यांचे चिरजीव गोपाळ सुरवसे यांनी सेनेकडुन पँनल करुन सरपंच पदी  मिना विजयकुमार लोहार यांच्या सह सदस्य निवडुन आणुन ग्रामपंचायतवर सत्ता कायम ठेवली.

खंडाळा  येथे  वय 83 वर्षिय  अपक्ष उमेदवार  भामा बाई भिसे या  सरपंच पदी निवडुन आल्या. ढेकरी सरपंच पदी तेजेस माने परिवर्तन ग्रामविकास पँनलचे विजयी झाले. कार्ला येथे दर्याप्पा बाबुराव मुळे सरपंच पदासह त्यांचे  पॅनल निवडुन आले.


 पक्षीय दावे 

तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतचा झालेल्या निवडणुकीत भाजपा ने ४८पैकी ३५ ग्रामपंचायत वर काँग्रेसने २६ व शिवसेनेने १२ग्रामपंचावत वर वर्चस्वाचा दावा केला आहे.


 
Top