तुळजापूर / प्रतिनिधी -
कोरोना नियम दोन वर्षानंतर शिथील करण्यात आल्यानंतर सर्वञ लग्नाची धुम सुरु असुन या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेची वावर याञा करण्यासाठी तिर्थक्षेञी तुळजापूरात नवविवाहीत नवदांम्पत्य मोठी गर्दी करत आहेत.
दररोज हजारो व मंगळवारी, शुक्रवार, रविवार गर्दी दिवशी अडीच हजार चा आसपास नवविवाहीत नवदांम्पत्य पारंपरिक पुजारी वृदांन कडुन देविजींचा वावर याञेचा कुलधर्मकुलाचार करुन मनोभावे दर्शन घेवुन आपल्या नव्या संसारी आयुष्यास आरंभ करीत आहेत.
हिंदू धर्मात लग्न सोहळा संपन्न होताच आपआपल्या कुलदेवतांची कुलधर्मकुलाचार करण्याची प्रथा परंपरा असुन ती आजही पाळली जाते. सध्या महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक आंध्र मध्यप्रदेश तेलगंणा गुजरात राज्यातील सर्वजातीधर्माचे नवविवाहीत नवदांम्पत्य आई-वडील, बहीणी सह नातेवाईक समवेत खाजगी वाहनांनी तिर्थक्षेञी येवुन श्रीगोमुख श्रीकल्लोळ तिर्थकुंडात स्नान करुन जोडीने देविजींची खणनारळ साडीचोळी अभिषेकपुजा गोंधळ पुरणावारणाचा नैवध सह अन्य वावर याञेचे धार्मिक विधी सहकुंटुंब देवदेव करुन देविदर्शन घेत आहेत.देवीदर्शन नंतर बाजारपेठेत येवुन देविची मुर्ती फोटो प्रासाद साहित्य खरेदी करुन पुजारीवृंदांनकडे महाप्रसाद घेवुन समाधानाने गावी जात आहे.
नवविवाहीत नवदांम्पत्य खाजगी वाहनांनी येणे पसंत करीत असल्याने शहरातील वाहनतळे वाहनांनी भरुन जात आहेत.उस्मानाबाद महामार्गरस्ता सह शहरातील रस्त्यावर सर्वञ वाहने उभे राहिल्याने भाविकांना मंदीरात जाता-येताना कसरत करावी लागत होती. पहाटे पासुनच देविंजींचा दर्शनार्थ भाविकांन सह नवविवाहीत नवदांम्पत्य गर्दी करीत आहेत. दिवसभर दर्शन मंडपातील रांगा भाविकांनी भरभरुन वाहत आहेत. लग्नतिथी संपेपर्यत भाविकांचा हा ओघ असाच राहणार आहे.