तुळजापूर/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरती मोबाईल कॅन्टीन सुरू करण्याची मागणी सैनिक फेडरेशन तुळजापूरने तहसिलदार  व  जिल्हा सैनिक अधिकारी मेजर ( नी.) श्री मिलिंद तुंगार  यांना  निवेदन देवुन केली आहे. 

 आर्मी सीएसडी फिरती कॅन्टीन सर्व तालुक्यांमध्ये सुरू करावी अशी मागणी सैनिक फेडरेशन तालुका तुळजापूर तर्फे करण्यात आली. यावेळी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे , दादा खाबोले, विठ्ठल लोखंडे, सुर्यकांत भोजने,श्रीराम शेंडगे,राम धुरगुडे ,चंद्रकांत भाजी,श्री सिद्धगणेश व अनेक माजी सैनिक उपस्थित होते. 

 
Top