उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वसंत प्राथमिक आश्रम शाळा जवाहर माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यानगर बावी ता.जि.उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व कै. सोबा दिपला राठोड यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमा व कार्याला अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जगताप बी.यू.यांनी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कै. सोबा दिपला राठोड यांच्या कार्याचा संपूर्ण इतिहास सांगून मार्गदर्शन केले. याप्रसंगी साकळे बी.एस. प्रास्ताविक भाषण केले . यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ शिक्षक सुरवसे जी.एन.जाधव निलेश, अनमुलवाड शिवाजी प्राध्यापक सुपनार लक्ष्मण उपस्थित होते . तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक विनोद राठोड यांनी केले, तर प्राध्यापक अमोल शिंपी यांनी आभार मानले.


 
Top