तुळजापूर/ प्रतिनिधी-

टोमॅटोस कवडीमोल भाव मिळत असल्याने बाभळगाव येथील पाटील बंधूना सहन करावे लागते लाखो रुपये नुकसान. 

मौजे बाभळगाव येथील प्रकाश पाटील व विकास पाटील या दोन बंधूंनी टोमॅटोच्या लागवटीतून बऱ्या पैकी उत्पन्न मिळेल या आशेपोटी हजारो रुपये खर्च करून दीड एकर शिवम ज्वारी जातीचे गावरान टोमॅटो ची लावणं दोन महिन्यापूर्वी केली होती.

 योग्य नियोजन करीत वेळोवेळी खत औषध व ठिबक सिंचनच्या द्वारे पाण्याचे नियोजन केले. पाटील बंधूंनी मेहनत केल्या प्रमाने टोमॅटोनी चांगलाच बहर घेतला आता आपणांस या टोमॅटो पासून चांगला नफा होईल ही आशा पाटील बंधूंना होती मात्र भाजी मार्केट मध्ये दोन महिन्यापूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने जाणारे टोमॅटो आज केवळ दहा टे अकरा प्रति किलो दराने जातात त्यामूळे अचानक टोमॅटोचा भाव कमी झाल्याने टोमॅटोचे उत्पन्न चांगले निघून सुध्दा भाव कमी असल्याने होणाऱ्या नफ्यात मोठीच घट झाली. त्यामूळे चांगले उत्पन्न निघून ही बऱ्या पैकी नफा होत नसल्याची खंत प्रकाश पाटील व विकास पाटील या बंधूंनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. 


 
Top