तुळजापूर/ प्रतिनिधी-

 अवकाशातील ग्रह तारे प्रत्यक्षात जमीनीवर  उतरल्याचा साक्षात्कार आज आयुका,पुणे येथील वैज्ञानिकांनी उपस्थितांना घडवला. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग संचालित,MSFDA (महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था,पुणे) आणि आयुका पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘Science, Astronomy and Society’  या विषयावर  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर येथे  २ आणि ३ डिसेंबर २०२२ रोजी दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत ७ जिल्ह्यामधील १९ महाविद्यालयातील ८० शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

 कार्यशाळेच्या प्रथम दिवशी आज सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी आकाश दर्शनाचा आनंद लुटला. यामध्ये आयूका मधील नामवंत खगोल भौतिक शास्त्रज्ञ प्रोे. ध्रुबा सैकिया, त्यांचे सहकारी श्री. जमीर मानुर आणि प्रकाश अरुमुगासामी यांनी मार्गदर्शन केले. चंद्राचा पृषठभाग, गुरू ग्रहाचे चंद्र, शनी ग्रहाभोवती ची कडी उपस्थितांना आयुकाच्या प्रगत टेलिस्कोप मधून याची देही याची डोळा पाहायला भेटली. अवकाश दर्शनासोबतच त्याशी निगडित अनेक गोष्टींवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. 

 सदर कार्यशाळेच्या पूर्वसंध्येला MSFDA चे उपसंचालक श्री. राहुल कदम यांनी आपली उपस्थिती दर्शवत आकाश दर्शनाचा आनंद लुटला. या कार्यशाळेची व्यवस्था डॉ. सुहासिनी देसाई, मॅनेजर, ट्रेनिंग अँड अकॅडमीक्स, MSFDA, डॉ पांडूरंग बरकले, सल्लागार (रूसा), श्री. रोहित लोंढे आणि सौ. तोशिता तांडेल  यांनी पाहिली.


 
Top