उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती मोर्चा समीतीचा बुधवार 21 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला. कृती समितीवर विश्वास ठेवून राज्यातील जवळपास 15 हजार पाटलांनी या मोर्चेत सहभाग नोंदविला. यासह जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी या महामोर्चास भरभरून प्रतिसाद दिला आहे. कृती समिती या विश्वासाला बिलकुल तडा जाऊ देणार नाही.या सर्व मागण्या मान्य होत पर्यंत कृती समितीचा कुठलाही सदस्य शांत बसनार नाही. तो पर्यंत हा लढा सुरुच असल्याची असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समितीचे समनव्यक श्री महेशंकर पाटील यांनी दिली.

    राज्यातील पोलीस पाटलांच्या अनेक मागण्या (पोलीस पाटलांना किमान वेतन मिळवावे, 1967 च्या अधिनियमातील बदल, पेन्शम योजना किंवा सेवानिवृत्ती नंतर एक रक्कमी मदत, आजपर्यंत निघालेल्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी) गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी राज्यातील विविध संघटना आपापल्या स्तरावरून ही लढाई लढत होते. प्रशासनास याची संधी मिळू नये यासाठी राज्यातील पोलीस पाटलांनी पुढाकार घेऊन 9 संघटनांना एकत्र आणले. कृती समितीच्या माध्यमातून प्रशासन दरबारी लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होती. अधिवेशना पूर्वी या आंदोलनास यश न आल्याने बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी कृती समितीच्या माध्यमातून महामोर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यात कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री मंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडवणीस साहेबांना निवेदन देऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मागण्या संदर्भीय बैठक आयोजित करण्याचे शब्द घेतले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील स्थापन होण्यासाठी श्री माऊली मुंढे परळी,श्री प्रमोद माळी उस्मानाबाद, श्री आण्णासाहेब कोळेकर तुळजापूर, श्री नंदू हिवसे मागपूर यांनी अथक परिश्रम घेतल्याची व या मागण्या जो पर्यंत पोलीस पाटलांच्या पदरात पडत नाहीत. तो पर्यंत कृती समितीच्या कुठल्याही सदस्यांना शांत बसू देणार नसल्याची चर्चा कृती समितीचे समनव्यक श्री महेशंकर पाटील पोलीस पाटील एकुरगा हे करीत होते.

 
Top