उस्मानाबाद /प्रतिनिधी

निपुन भारत योजनेतंर्गत डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी अमरावती येथे आश्रमशाळेतील शिक्षकासाठी आयोजीत केलेले प्रशिक्षण रद्द करावे, अशी मागणी शिंगोली आश्रम शाळेतील शिक्षक सतिश कुंभार यांनी केली आहे.

शेजारील देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ होत असुन या पार्श्वभुमीवर भारतात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्यामुळे निपुण भारत योजनेनुसार डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी संत गाडगेबाबा विद्यापीठ रोड, अमरावती येथे उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली येथील आश्रमशाळा शिक्षकांना तीथे जावुन चार दिवसाचे प्रशिक्षण घेण्याची परिस्थिती नाही. कोविड सदृश्य परिस्थितीमुळे शिक्षक मानसीक तणावात असल्याने प्रशासनाने आयोजीत केलेले प्रशिक्षण रद्द करावे, अशी मागणी शिंगोली आश्रम शाळेचे शिक्षक सतिश कुंभार यांनी केली आहे.

 
Top