विभागीय रोलबॅाल स्पर्धा : विधामाताचा संघ ठरला उपविजेता

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 फिटनेसच्या बाबतीत जागरुकता वाढल्याचे सध्या पहावयास दिसत आहे, अनेकजण फिटनेसच्या द्रुष्टिने क्रीडा प्रकारांचा सराव देखील करत आहेत मात्र जर रोलबॅाल सारखा पर्याय निवडला तर हा क्रीडा प्रकार फिटनेससह करियरच्या द्रुष्टिने उत्तम पर्याय असल्याचे मत जिल्हा रोलबॅाल संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रोलबॅाल असोसिएशन अॅाफ उस्मानाबाद च्या वतीने उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित विभागीय शालेय रोलबॅाल स्पर्धेचे उदघाटन जिल्हा रोलबॅाल संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा अधिकारी कैलास लटके, जिल्हा रोलबॅाल संघटनेचे सचिव गिरीष पाळने, लातुर जिल्हा सचिव एम अहमद, नांदेड जिल्हा सचिव आलीम खान, क्रीडा भारती लातुर विभाग प्रमुख कुलदिप सावंत, तांत्रिक समिती अध्यक्ष नितीन जामगे, सचिव लायक सय्यद, स्पर्धा विभाग प्रमुख कैलास लांडगे आदिंसह खेळाडु, संघ मार्गदर्शक व व्यवस्थापकाची प्रमुख उपस्तिथी होती.

स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रुतीय प्रमाने 

१४ वर्ष मुलात माउंट लिटेरा स्कुल लातुर, मुलीत शारदा इंटरनॅशनल स्कुल लातुर, १७ वर्षे मुलात परीमल महाविधालय लातुर, अनंत तुळजाराम नाईक विधालय नळेगाव लातुर, जिल्हा परीषद कन्या प्रशाला वाशी उस्मानाबाद, मुलींमध्ये परीमल महाविधालय लातुर, अनंत तुळजाराम नाईक विधालय नळेगाव लातुर, सना अॅग्लो उर्दु हायस्कूल नांदेड, १९ वर्षे मुले श्री देशीकेंद्र विधालय लातुर, विधामाता हायस्कुल उस्मानाबाद आणि मुलींमध्ये श्री देशीकेंद्र विधालय लातुर, विधामाता हायस्कुल उस्मानाबाद,

 
Top