तुळजापूर/ प्रतिनिधी-

 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूला नॅक मूल्यांकनामध्ये अ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर व सर्व सहकार्यांचा यथोचित सत्कार व अभिनंदन केले.

    यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे म्हणाले की, तुळजाभवानी महाविद्यालय हे ग्रामिण भागातुन ज्ञानदानाचे कार्य करत आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाविद्यालयास नॅक मूल्यांकनामध्ये अ मानांकन प्राप्त झाले ही बाब श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दृष्टीने तसेच या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय भूषणावह व कौतुकास्पद यश  आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी जे अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नांना एक ऐतिहासिक यश प्राप्त झाले यामुळे इतर महाविद्यालयासमोर  एक आदर्श निर्माण झाला आहे.मुळामध्ये या महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य वेदकुमार, प्राचार्य के एस नाईक, प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी या महाविद्यालयाचा शैक्षणिक व सांस्कृतिक पाया भक्कम केला ,हे प्राप्त झालेले यश खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या विचारांचे यश आहे, आणि हे यश अबाधित ठेवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयात भविष्यात नवनवीन रोजगारोन्मुख अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती,सदर प्रसंगी नॅक समन्वयक मेजर डॉ वाय. ए.डोके यांच्या सह डॉ एस.एम.देशमुख, डॉ नेताजी काळे, ग्रंथपाल दिपक निकाळजे , प्रा जी व्ही बाविस्कर तसेच इतर सर्व सहकाऱ्यांचा मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रा धनंजय लोंढे यांनी तर सूत्रसंचालन प्रा जे बी क्षीरसागर यांनी केले.

 
Top