तुळजापूर / प्रतिनिधी-

  श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी   नवराञ उत्सवास     शुक्रवारी   ( दि . ३० ) श्रीगणेश ओवरीत शाकंभरी देवि प्रतिमा प्रतिष्ठापना केल्यानंतर आई राजा उदो सदानंदीचा उदो-उदोच्या गजरात संभळाच्या कडकडाटात घटस्थापना होऊन उत्साहात  प्रारंभ झाला .  शाकंभरी नवराञोत्सव प्रथम दिनी देविदर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.

 शुक्रवार   दि..23रोजी निद्रस्त करण्यात आलेली देविजींची मूर्ती शुक्रवार दि.३० रोजी  पहाटे  मुख्य  गाभाऱ्यातील चांदीच्या सिंहासनावर  पहाटे विधीवत  प्रतिष्ठापित करण्यात आली.नंतर देविजींना सिंहासन महाअभिषेक करून  वस्ञोलंकार घालण्यात आले.

 नंतर पुनश्च सकाळी सहा वाजता पुनश्च देविजीस शांकंभरी नवराञोत्सव यजमान सह अन्य सिंहासन पुजा करण्यात आल्या नंतर भाविकांंचे  अभिषेक पुजानंतर देविंजींना वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर  मंदिरातील श्रीगोमुख तीर्थकुंडातून जलकुंभ  ( घट ) पुजन करुन पारंपारिक धार्मिक वाद्यांच्या गजरात  मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आले . श्रीगणेश ओवरीत शांकंभरी देवि प्रतिमा शेजारी  घटस्थापना करण्यात आली.

यावेळी   महंत तुकोजीबुवा , महंत हमरोजी बुवा , पाळीचे भोपेपुजारी शुभम दत्ताञय (सोनबा) कदम  यांच्या सह धार्मिक सहाय्यकव्यवस्थापक विश्वास परमेश्वर ,जनसंपर्कअधिकारी नागेश शितोळे,  लेखापाल  सिध्देश्वर इंतुले सह तिन्ही पुजारी मंडळ प्रमुख पदाधिकारी सेवेदार भाविक यांची उपस्थिती होती.  नंतर यजमानांने   होमहवनासाठी स्थानिक ब्रह्मवृंदांना वर्णी देऊन निमंत्रित केले . या वेळी ' आई राजा उदो उदो ... ' च्या जयघोषाने मंदिर परिसरासह संपूर्ण तुळजापूरनगरी मदुमून गेली होती . राञी मंदीर  प्रांगणात देविजींचा  छबिना काढण्यात आला नंतर महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर नवराञोत्सवातील प्रथम माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली. 


 
Top