तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील हंगरगा (तुळ) ग्रामपंचायतचा निवडणुकीत सरपंचपदी तुळजाई ग्रामविकास पॅनलचे ए.रवी शिरसाठ हे १९० मताधिक्याने विजयी झाले.
अॅड.जयवंत इंगळे यांच्या नेतृत्वाखालील तुळजाई ग्रामविकास पॅनल मधुन सातही जागावर प्रभाग एकमधून सोमनाथ शिंदे, लिंबराज गायकवाड, प्रभाग दोनमधून रोहिदास हंगरगेकर, सत्यभामा गायकवाड, प्रभाग तीनमधून अॅड.जयवंत इंगळे,माधुरी नन्नवरे, मुक्ता डुकरे हे विजयी झाले.