उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

लिंगायत धर्मासाठी लोकसभेत उठवलेल्या आवाजात बद्दल लिंगायत धर्मीय समाज बांधवांच्या वतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या दहाव्या सत्राच्या हिवाळी अधिवेशनात लिंगायत समाजाच्या वतीने मागणीचा विचार करुण लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा अशी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या मागणी बद्दल आज धाराशिव येथे लिंगायत धर्मीय समाज बांधवांच्या वतीने धाराशिव येथे त्यांचा शाल पुष्पगुच्छ पेढा भरऊन सत्कार केला.याप्रसंगी आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर लिंगायत समाजाचे वैजिनाथ गुळवे,विठ्ठल आप्पा खरे,रवि कोरे आळणीकर, सोमनाथ गुरव,किरण शेटे,महेश उपासे,गिरिष पाळणे,शिवयोगी चपणे,रवि लगदिवे, प्रसन्न कथले, अर्जुन साखरे,आदि समाज बांधवांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

समस्त लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळर यांचे समाज बांधवांनी आभार मानले

 
Top