तुळजापूर /प्रतिनिधी- 

सध्या सर्वत्र शिव कार्य तसेच समाज कार्यात अग्रेसर असलेल्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या राज्य प्रवक्त्या शीतल लाडके यांनी  आई तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले.त्या तुळजापूर दौऱ्यावर आल्या होत्या.यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या विविध कामाबाबत पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

 रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान धाराशिव विभाग तर्फे त्यांचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी धाराशिव विभागातील प्रकाश भंडे,गणेश तानवडे, राम जळकोटे यांच्या सह सदस्य उपस्थित होते.

 
Top