उमरगा/ प्रतिनिधी-

 सात वर्षीय मुलाने दाखविलेल्या हुशारीने उमरगा शहरातील सय्यद बाशा दर्गा गल्लीत बुधवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान अपहरणाचा डाव फसला.या घटनेमुळे मात्र शहरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील सय्यद बाशा दर्गा गल्लीत दिवंगत माजी मंत्री खालिकमिया काझी यांचे घर असून त्यांचे पुतणे मौजम (मन्नू) काझी तेथे राहतात.बुधवारी दि.30 रोजी मौजम (मन्नू) काझी यांचा सात वर्षीय मुलगा हामजा हा घराबाहेरील रस्त्यावर थांबला असता स्कुटी वर आलेल्या इसमाने त्याचे अपहरण करण्याचे प्रयत्न केले.यावेळी लहान मुलाने हुशारी दाखवीत त्या इसमाला पासून सुटका करून घेत आरडाओरड करीत घराकडे पळ काढला व वडिलांना सांगितले असता ते तात्काळ बाहेर आले पण स्कुटी वरील अज्ञात इसमाने तेथून पळ काढला होता.त्यानंतर मुलाच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली.या घटनेची माहिती गल्लीत वाऱ्यासारखी पसरली यामुळे सदरील मुलाच्या घरासमोर नागरिकांची एकच गर्दी केली होती.यावेळी सदरील मुलाच्या घरासमोरील मा.खा.रवींद्र गायकवाड यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरा आहे.त्यातील फुटेज मा खा.गायकवाड यांचे पुत्र युवा नेते किरण गायकवाड यांनी स्वतः तपासले असता त्यात एक पांढर्या रंगाच्या स्कुटी वर एक इसम आल्याचे दिसून येत आहे पण रस्त्याच्या खूप कडेने स्कुटी गेल्याने पूर्णपणे फुटेजमध्ये संबधित स्कुटी व इसम येऊ शकले नाहीत.पोलिसांनी घराकडे येणारे सर्व मार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरा मधील फुटेजचा शोध सुरू केला असून मुलाच्या वडिलांनी उमरगा पोलिसात तक्रार दिली आहे.या घटनेमुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने याची दखल घेत शोध सुरू केला आहे.

 

 
Top