उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्र  शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद मार्फत सामाजिक, क्रीडा,स्वयंरोजगार पर्यावरण विकास युवक विकास व राष्ट्रीय एकात्मता आदी क्षेत्रात वर्ग 2021-22 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळाला जिल्हा विशेष युवा मंडळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.जिल्हास्तरावर पुरस्काकरसाठी पात्र ठरलेल्या मंडळाला 25 हजार रुपये ,राज्यपातळीवर पात्र ठरलेल्या मंडळाला 1 लाख रुपये, राष्ट्रीय पातळीवरील पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम  5 लाख रुपये, व्दितीय 3 लाख रुपये व तृतीय 2 लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी दि.15 डिसेंबर 2022 पुर्वी नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला रुम नं-26 उस्मानाबाद येथे अर्ज दाखल करावे. अधिक माहितीसाठी 02472-222719 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांनी केले आहे.


 
Top