उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जेंव्हा एखादा इतिहास संशोधक सर्वसामान्यांना मराठवाडा  मुक्ती संग्राम  या विषया संदर्भात माहिती सांगत असतो. तेंव्हा त्याने हिंदू मुस्लिम हा भेदभाव न करता सत्य इतिहास लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. डॉ.सतीश कदम यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानमालेच्या सत्रात केले.

   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. 10 आणि 11 डिसेंबर 2022 रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, याप्रसंगी भाऊसाहेब उमाटे लेखक व इतिहास अभ्यासक, प्रा. डॉ. सतीश कदम इतिहास संशोधन, डॉ.रमेश दापके सेवानिवृत्त प्राचार्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी ऍड. शितल चव्हाण, प्रवीण नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  पुढे बोलताना प्रा. डॉ. कदम म्हणाले की, मराठवाडा या संस्थानातील 85 टक्के जनता ही हिंदू व पंधरा टक्के जनता ही इतर जाती धर्माची जनता असतानाही निजाम हा मुस्लिम प्रशासक होता. मराठवाड्याच्या विकासात, जडणघडणीत प्रत्येक जाती धर्माचे योगदान आहे. जेंव्हा कोणी इतिहास संशोधक मराठवाडा मुक्ती संग्राम संदर्भात सर्वसामान्यांना माहिती सांगत असतो. तेंव्हा त्याने कोणताही भेदभाव न करता सत्य इतिहास सांगावे जेणेकरून सत्याची माहिती लोकापर्यंत माहीत होईल असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. सतीश कदम यांनी केले.

 लेखक तथा इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी या व्याख्यानमालेच्या सत्रात म्हटले की मराठवाडा मुक्ती संग्रामात सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग असून आपणास फक्त हिंदू  समाजाचे योगदान आहे असे सांगितले जाते .पण वास्तव हे आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात बहुजन समाजाचे, मुस्लिम समाजाचे योगदान ही त्याच प्रमाणात आहेत. हे विसरून चालणार नाही हा सत्य इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी केले.

  व्याख्यानमालेचे तीसरे वक्ते अॅड.शितल चव्हाण यांनी सांगितले की ग्रंथालये ही नौकरदार बनवणारे कारखाने न बनता, राज्यकर्ते बनवणारे कारखाने बनली पाहीजेत जेणेकरून सर्वसामान्य माणसाला योग्य न्याय मिळेल.

  अध्यक्षीय भाषणात डॉ.रमेश दापके म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास हा खुप मोठा आहे .तो मराठवाड्यातील प्रत्येकाने बारकाईने अभ्यास करने गरजेचे आहे.

 कार्यक्रमाकरिता जिल्हाभरातील जिल्हा ग्रंथालय चे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव इंदलकर यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी मानले.


 
Top