उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आपल्या पाल्याने स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करावे असे वाटत असल्यास संबंधित पाल्यास लहान वयात कठोर परिश्रम करण्याचे मार्गदर्शन करावे.व त्याच्या अंगी कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, ध्येय यांचे अंगभूत गुण असावे लागते असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव च्या दुस-या दिवशी च्या दुपारच्या सत्रातील  स्पर्धा परीक्षा संधी व आवाहने  या विषयावर बोलताना केले.

 जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात स्पर्धा परीक्षा संधी व आवाहने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव, नालंदा अकॅडमीचे संचालक गोपाळ हजारे, शिवाजीराव चव्हाण, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी, ग्रंथालय निरीक्षक राठोड, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  पुढे बोलताना श्री. गुरव म्हणाले की, वयाच्या 10 ते 11 वर्ष वयापासून प्रत्येकाच्या पाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली असता यश प्राप्त करणे सोपे होईल आणि वयाच्या 21 ते 25 वर्षापर्यंत वरीष्ठ अधिकारी पदापर्यंत पोहोचने हा त्यांच्या करीता खूप मोठा विषय राहणार नाही. योग्य वयात आपल्या पाल्यास योग्य नौकरी न भेटल्यास, त्याला ज्या क्षेत्रात रुची आहे. तो व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करावे, त्यांच्या जीवनाची घडी बसवावी, असे प्रतिपादन श्री.गुरव यांनी केले. यावेळी नंतर शिवाजीराव चव्हाण म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याला होकारार्थी पाठबळ दिल्यास तो कधी यशाला गवसणी घालून यशाचं शिखर पार करतो हे माहीत होतं नाही. प्रत्येकाने आपल्या घरातील वातावरण शैक्षणिक, स्वच्छ,सुंदर ठेवल्याने यशाची नांदी वाहण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रतिपादन केले.

  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लहुराज लोमटे यांनी तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी मानले.


 
Top