परंडा / प्रतिनिधी -
तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे पशु किसान क्रेडिट कार्ड विषयांवर शुक्रवार दि.९ रोजी पशुसंवर्धन अधिकारी डॉ जगदाळे यांनी भोंजा गावातील पशुपालन शेतकऱ्यांना माहिती दिली असता आपल्या पशु पक्षी म्हणजेच गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या इत्यादी पशुनां सांभाळ करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या व्यवसायात दुप्पट उलाढाल व्हावी म्हणून केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकार ने थेट पशु पक्षी पालक लाभार्थी यांना संबंधित गावनिहाय दत्तक बॅंक कर्ज देणार आहे.असे संबोधीत केले.
यावेळी माजी सरपंच राम नेटके, संदिपान मोरे, विलास नेटके, छगन मोरे, लघुउद्योग सल्लागार गणेशदादा नेटके, माजी सदस्य विनोद कोळी, उत्रेश्वर नेटके, बालाजी मोरे, अमोल मोरे, मधुकर टमटमे, दादा मोरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील पशुपालन शेतकऱ्यांनी, तरूणांनी, बचत गटातील महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ जगदाळे यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार गणेश नेटके यांनी मानले.