उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सचिवपदी उस्मानाबाद येथील खलील ताजोद्दीन पठाण यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील,खा.सुप्रियाताई सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ऍड. मोहम्मद खान पठाण यांनी ही निवड केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव मसूदभाई शेख,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर,

यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र खलील पठाण यांना देण्यात आले.  पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत राहावे, असे निवड पत्रात नमूद करण्यात आले आहे.पठाण यांच्या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्यांनी स्वागत केले आहे.


 
Top