उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी अध्यक्ष धनंजय राऊत यांनी सर्वानुमते जाहिर केली आहे.
विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यासाठी समितीचे नूतन अध्यक्ष धनंजय राऊत यांनी कार्यकारीनी निवडीसाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची सोमवारी रविवारी दि. 12 रोजी सायंकाळी रोमा हॉटेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला शहरातील व ग्रामीण भागातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शिवप्रेमींना मार्गदर्शन करत 2023-24 साठी समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत यांनी सर्वानुमते समितीची कार्यकारणी जाहीर केली. ती याप्रमाणे अध्यक्ष-धनंजय राऊत,
कार्याध्यक्ष-वैभव मुंडे, कार्याध्यक्ष-संभाजी फरताडे (ग्रामीण), कोषाध्यक्ष-सतीश कदम, कोषाध्यक्ष-राकेश सूर्यवंशी (ग्रामीण), सचिव-दिलीप चौधरी सर, उपाध्यक्ष-गजानन खर्चे, विलास लोकरे, बिलाल कुरेशी, अभिजीत देडे, विकास पवार, प्रशांत साळुंके, रुद्र भुतेकर, प्रवक्ते- विनोद लांडगे, सहकार्याध्यक्ष-दाजीआप्पा पवार, श्याम निंबाळकर, सहकोषाध्यक्ष-विक्रम राऊत, शुभम पाडे, खजिनदार-आकाश सर्जे, सहसचिव-पंकज चव्हाण, दिग्विजय जावळे, सहसंघटक-कृपालसिंह ठाकुर, प्रवीण कांबळे, संजय गजधने, प्रसिद्धी प्रमुख-राजकिरण सोनवणे, किशोर साळुंके, सहप्रसिद्धीप्रमुख-सौरभ गायकवाड, राजेश बंडगर, संघटक-सुधाकर पवार आदी