उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बीड येथे २३ ,२४ , २५ डिसेंबर रोजी नागपूर क्षेत्रीय संस्कृती मंत्रालय भारत सरकार आयोजित संस्कार भारती देवगिरी प्रांत कलासाधक संगम २०२२ संपन्न झाला. यामध्ये संस्कार भारती धाराशिव  व  तुळजापूर बीड कलसाधक संगमात सादरणीकरण अव्वल ठरली आहे. 

 प्रांतातील जळगाव , चाळीसगाव ,धुळे, माजलगाव, लातूर , नांदेड, धाराशिव , माजलगाव, आदि संस्कार भारती समितींचे चित्र कला, नृत्यकला, साहित्य, गायन, वादन, नाट्यकला आदि कलेचे सादरणीकरण करण्यात आले या तीन दिवसीय कलासाधक संगमाचे उदघाटक सिने अभिनेते योगेश  सोमण , संस्कार भारती  राष्ट्रीय सहसंघटनमंत्री अभिजीत गोखले, प्रांतध्यक्ष भरत लोळगे मातृशक्ती प्रमुख श्रीमती स्नेहल पाठक तर समारोप समारंभास अभिनेते संदीप पाठक , महामंत्री जगदीश देशमुख, कोषप्रमुख मोहन रावतोळे महाव्यवस्थापक प्रमोद वझे यांच्या उपस्थितीत संपन्नतेसह पद्मश्री स्व. हरिभाऊ वाकणकर जन्मशताब्दी चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. रंगधारा शोभा यात्रेत पद्माकर मोकाशे यांच्या संकल्पनेतील खंडोबाची काटी,संस्कार भारतीचे पदाधिकारी श्रीपतराव भोसलेचे कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी पोतराज वेशभुषेत तर सुरेश वाघमारे यांच्या वासुदेव वेषभुषेने सर्वांचे लक्ष वेधले . जवाहर विद्यालय अणदूर कलाध्यापक कैलास बोंगरगे यांचे हालगी वादन सादरीकरण केले त्याचबरोबर युवा भाऊडकार कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचे स्त्री समस्या  विषया वर भारूड सादरणीकरण केले.संस्कार भारती देवगिरी प्रांत लोककला प्रमुख डॉ. सतिश महामुनी व जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी यांच्या मार्गदर्शनात तुळजाभवानी पारंपारिक गोंधळ सादरणीकरणात मुख्य गोंधळी शेषनाथ वाघ, दिपक महामुनी, अध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे, लक्ष्मीकांत सुलाखे, पुजारी अविनाश धट , प्रसाद महामुनी, गायक अजय राखेलकर ,      प्रसन्नकुमार कोंडो हरिश्चंद्र लोंढे, रंगराज पुराणिक ,संभळ प्रणव रेणके , ढोलकी संदीप रोकडे, हार्मोनियम सुरेश वाघमारे , खंजीरी गणेश कसपटे ,बाबा प्रयाग यांच्या सहभागात सादरणीकरण करण्यात आले गोंधळ लोककलेचा सर्व रसिकांनी  मनोभावी आनंद घेतला.


 
Top