उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना ठाकरे गटाचे न.प.चे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांच्यासह चौघांनी  ३० कोटीच्या विकासकामावरील स्थगिती उठविण्यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शहरातील विविध संघटनेने पाठींबा देऊन आज दिनांक २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोनल केले आहे. 

दरम्यान आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शिवसेनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील गेट मध्ये सरकारने घेतलेल्या झोंपेचे सोंगेचे निषेर्धाथ झोंपा काढो आंदोलन केले. बाळासाहेबाची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळंुखे यांनी माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या काळात जिजामाता उद्यानावर २०१५ ते २०१८ पर्यंत चार कोटी ५० लाख रुपये खर्च झाला असून या खर्चातून नेमका काय विकास केला. असा प्रश्न उपस्थित करून स्थगित केलेल्या कामाची टक्केवारी परत देण्याच्या भीतीमुळे आंदोलनचे नाटक असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.  या संदर्भात उस्मानाबाद नगर पालिकेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी साळुंखे यांचा आरोप हास्यास्पद असून मार्च २०२२ मध्ये प्रशासकीय मंजूरी मिळालेली आहे. आमचा कार्यकाळ ३० डिसेंबर २०२१ मध्ये संपला. त्यानंतर जून-जुलै २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया झाली आहे. प्रशासकाच्या काळात आम्ही कोणताही हास्तक्षेप करू शकत नाही, त्यामुळे टक्केवारी प्रश्नच येत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. 

३० डिसेंबर पर्यंत अहवाल देणार

शहरातील विकास कामासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाने चालु केलेल्या आंदोलनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सहावा  दिवस असून विकास कामाच्या निवेदाबाबत सीओ कडून अहवाल मांगवा, असे पत्र नगर प्रशासन विभागाचे सहआयुक्त िशवने यांना दिल्याचे सांगण्यात आले. याबाबत उस्मानाबाद न.प.चे सीओ वसुधा फड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विकास कामासंदर्भात नेमकी अनियमिता काय झाली आहे. याबाबत ३० डिसेंबरपर्यंत अहवाल देणार असल्याचे सांगितले, असे आपण उपोषणकर्त्यांना ही कळविले असल्याचे सांगितले. 

 
Top