तुळजापूर /प्रतिनिधी- 

भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या सूचनेनुसार आमदार राणाजगजीतसिंहजी पाटील यांच्या उपस्थितीत,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी संजयकुमार बोंदर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

आर्ट ऑफ लिव्हिंग चे योगा प्रशिक्षक असलेले आणि तुळजाभवानी मंदिर परिसर बाल भिक्षेकरी मुक्त करण्यात संजयकुमार बोंदर यांचा मोठा सहभाग होता, अध्यात्मिक समस्या, भाविकांच्या होणाऱ्या गैरसोयी, गो हत्या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे बोंदर यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याचा अनुभव असल्यामुळे बोंदर यांची भारतीय जनता पार्टी च्या धाराशिव जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली, नियुक्ती चे पत्र देताना भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, तालुका सरचिटणीस शिवाजीराव बोधले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, राजेश शिंदे, सचिन घोडके,व सहकारी उपस्थित होते.


 
Top