लोहारा/प्रतिनिधी

लोहारा नगरपंचायत यांच्या मागणीवरून आ.ज्ञानराज चौगुले यांनी शासनाडे  पाठपुरावा करुन लोहारा नगरपंचायतसाठी अग्निशमन आपत्कालीन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजने अंतर्गत अग्निशमन केंद्र बांधकामासाठी व अग्निशमन वाहन खरेदीसाठी एक कोटी 39 हजार 50 हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेतला आहे. यासाठी निधी मंजूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लोहारा शहरात अग्निशमन वाहन नसल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यासाठी अडचणी येत होत्या. शहरातील कचरा डेपोला सतत आग लागते. अशावेळी आग विझविण्यासाठी उमरगा, मुरुम, नळदुर्ग येथुन अग्निशमन वाहन बोलविण्यात येते. वाहन येईपर्यंत सर्व जळुन खाक होते.

त्यामुळे अग्निशमन वाहन उपलब्ध करून करुन देण्याची मागणी नगपंचायतीकडुन सातत्याने करण्यात येत होती. अखेर यासाठी निधी उपलब्ध झाल्याने नगरपंचायतने आ. ज्ञानराज चौगुले यांचे आभार मानले आहे. नगरपंचायतीने अग्निशमन वाहन मिळवण्यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजने अंतर्गत नगरपंचायतने अग्निशमन केंद्राच्या बांधकामांचे एक कोटी 10 हजार रुपयांचे अंदाजपत्रक उस्मानाबाद येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेऊन सादर केले होते. प्रस्तावास अनुसरुन एक अग्निशमन केंद्र बांधण्यास व एक अग्निशमन वाहन खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून अनुदान पोटी एक कोटी 39 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.


 
Top