उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आकांक्षित जिल्हा व आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यात खुद्द मुख्यालय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ भारती पवार यांनी स्वतः रुग्णांच्या रांगेत उभे राहून औषध गोळ्या घेण्यासाठी आपल्या हातातील कागद औषध निर्मात्याकडे दिला असता त्या औषध निर्मात्याने चक्क तुम्ही बाहेर जाऊन औषधे विकत आणा असा अजब सल्ला दिल्याने आरोग्य मंत्री अचंबित झाल्या. खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीच पोलखोल करुन उघडे पाडले आहे. विशेष म्हणजे  आकांक्षीत जिल्हा असल्याने केंद्र सरकारचे ही लक्ष आहे. जिल्हावासियांना बाहेरून विकतची औषधे खरेदी करण्याची वेळ दुर्दैवी वेळ आली आहे. 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.१ डिसेंबर रोजी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात सरप्राईज व्हिजिट  दिली. यावेळी डॉक्टर आपल्या केबिनमध्ये नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत उभा राहावे लागत होते अशी माहिती मिळताच त्या रूममध्ये जात होत्या. मात्र त्या रूम कडे जात असतानाच रुग्णांना औषधे देण्यासाठी असलेल्या रुमकडे त्यांची नजर गेली. औषध गोळ्या घेण्यासाठी मोठी गर्दी असल्यामुळे त्यातीलच एका रुग्णाचा केस पेपर भारती पवार यांनी आपल्या हातात घेऊन त्या देखील त्या रुग्ण रांगेत औषध घेण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांच्या हातातील केस पेपर त्यांनी औषध निर्मात्याकडे दिला. औषध निर्मात्याने चक्क ही औषधे इथे नाहीत तुम्ही बाहेरून विकत घ्या असा सल्ला दिला. त्यावेळी त्यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत रुग्णांची अशी गैरसोय कशासाठी चालविली आहे. त्यांना आवश्यक असलेले औषध गोळ्या का वितरित केल्या जात नाहीत ? अशा विविध प्रश्न विचारले

 जिल्ह्यात आरोग्य विभागासह इतर विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ जनतेला मिळतो किंवा नाही ? जनतेच्या नेमक्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी डॉ सावंत यांनी पालकमंत्री या नात्याने किमान दर महिन्याला आढावा बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधने आवश्यक आहे. मात्र ते नेमके कशासाठी यापासून आलीप्त राहत आहेत असा प्रश्न जिल्हावासिय विचारीत आहेत.

खुद्द जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असलेली औषधे व गोळ्या उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने आश्चर्य  व्यक्त  केले जात आहे  परंडा या ठिकाणी महाआरोग्य शिबिर कशासाठी घेतले ? त्या रुग्णांना तरी औषध उपचार दिलाचा केवळ आमच्यासारखेच त्यांनाही बाहेरून औषधे खरेदी करण्यासाठी भाग पाडले ? असा संतप्त सवाल देखील यावेळी जिल्हा रुग्णालयातील काही नागरिकांनी उपस्थित केला.

रुग्णांना अत्यावश्यक औषधे का दिली जात नाहीत ?

जिल्हा रुग्णालय असल्यामुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील अनेक वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त व त्रस्त असलेले रुग्ण उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात येतात. या रुग्णालयात येणारे रुग्ण हे सर्वसामान्य कुटुंबातील व आर्थिकदृष्ट्या गरीब असतात. मात्र त्या रुग्णांना अत्यावश्यक असलेली औषधे व गोळ्या या रुग्णालयात का उपलब्ध करून दिला जात नाहीत ? त्यांना गोळ्या उपलब्ध न करून देण्यामागे नेमके कोण आहे ? त्यासाठी कोण सुपारी देत व घेत आहेत ? अशा भाषेत आरोग्य यंत्रणेची कान उघडणी केंद्रीय आरोग्य  राज्यमंञी  डॉ. पवार  यांनी केली  गेल्या तीन वर्षांपासून रक्तदाबच्या  (बीपीच्या ) गोळ्या पेशंटला गोळया मिळत नसल्याची तक्रार गोविंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

चौकशी समिती नेमण्याच्या दिल्या सूचना

जिल्हा रुग्णालयात अनेक डॉक्टर गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टर मंडळींना रुग्णांना सेवा देता येत नसेल तर काम सोडून द्या, असा सल्ला केंद्रीय राज्य मंञी यांनी  दिला. तसेच जिल्हा रुग्णालयासह आरोग्य विभागात होत असलेल्या सावळ्या गोंधळाबाबत तात्काळ चौकशी समिती नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ पवार यांनी दिल्या.

 
Top