उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदती सपंणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक कार्यक्रमाची प्रत आणि सार्वत्रिक निवडणूका असणाऱ्या ग्रामपंचायतीची यादी ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.

 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी आदर्श आचारसंहितेबाबत वेळोवेळी दिलेल्या निर्देश किंवा आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करावी तसेच संबधित तहसीलदार यांना निवडणूक कामामध्ये योग्य ते सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी निर्देश दिले आहेत.


 
Top