उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील आरणी येथील युवा सरपंच गोविंद नारायण हारकर यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावपातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कारान सन्मानित करण्यात आले. संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री फगनसिंह कुलसते, माजी लोकसभा अध्यक्ष चिरंजितहींह अखाल, सामाजिक कार्यकर्त्या अलका सपकाळ आदी मान्यवरांच्या हस्ते सरपंच हारकर यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या भरीव यशाबद्दल महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सरपंच हारकर यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.

 यावेळी काँगे्रस पक्षाचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे,  प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहीत पडवळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक आशिष मोदानी, तसेच प्रभाकर लोंढे, समीयोद्दीन मशायक, अ‍ॅड.राहुल लोखंडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सुभाष हिंगमिरे, संजय गजधने, पंचायत समितीचे माजी सदस्य आश्रुबा माळी, अंकुश पेठे, सौरभ गायकवाड, प्रवीण पडवळ, कफिल सय्यद, सुरेंद्र पाटील, संदीप चादरे यांच्यासह काँगे्रस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top