उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील ईटकूर येथील गायरान पारधी पिडीतील सुनिता राजेंद्र काळे (वय-28 वर्ष) आणि तिचा मुलगा किरण राजेंद्र काळे (वय-05वर्षे) यास घेऊन दि.01 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12.00 वा.घरातून कोणासही न सांगता निघून गेली आहे.

 स्त्रीचे वर्णन रंग काळा-सावळा, उंची सव्वा चार फुट, अंगात काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज, बांधा सडपातळ, नाकात नथणी, पायात जोडवे, कानात झुमके, गळ्यात काळे मणीचे गोफ, पायात पांढऱ्या रंगाचा सैंडल अशा प्रकारे आहे तर मुलाचे वर्णन रंग काळा-सावळा, उंची 2.5 फुट, अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, बांधा सडपातळ, गळ्यात काळा दोरा, पत्र्याची पेटी या प्रमाणे आहे.

 या प्रकारे वर्णन असलेले स्त्री व मुलगा कोणास आढळून आल्यास कळंब पोलिस ठाणे (02473-262133), पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री.खनाळ (मो.8552817101) आणि पी.पी.जाधव (9049337210) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस ठाणे कळंब यांनी केले आहे.


 
Top