उस्मानाबाद /प्रतिनिधी-

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त उस्मानाबाद येथे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांच्या वतीने धाराशिव प्रशाला आणि  अंगणवाडी (सांजा वेस) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी नगरसेवक दिलीप काका गणेश, मुख्याध्यापक पी.एस.जाधव, माढेकर सर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळ व काँग्रेसचे योगदान याविषयी माहिती देण्यात आली.

 
Top