उस्मानाबाद /प्रतिनिधी-

 शहरातील तेरणा पब्लिक स्कूल (सिबिएसई) येथे अंतर्गत शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाना प्रारंभ झाला आहे. संस्थेचे सचिव अनंतराव उंबरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून क्रीडा स्पर्धाना सुरुवात करण्यात आली.                   

उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कूल ही मराठवाडा विभागातील पहिली इंग्रजी माध्यमाची पहिली ते दहावी पर्यंतची निवासी शाळा आहे. या शाळेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. सोमवारी दि.26डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धेचे संस्थेचे सचिव अनंतराव उंबरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी सचिन टापरे, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.

 
Top