उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ.  तानाजीराव सावंत यांचे स्वीय सहायक सोमनाथ रेड्डी यांचा पदोन्नतीबद्दल बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे स्वीय सहायक श्री. रेड्डी यांची  द्वितीय श्रेणीतून प्रथम वर्ग श्रेणीमध्ये उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. लातूर विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. या पदोन्नतीबद्दल उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी श्री. रेड्डी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.


 
Top