उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज दि. 12 डिसेंबर 2022  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीत तंबाखू मुक्त शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त शाळा तंबाखू विरोधी कायदा आदी विषयांवर  चर्चा करण्यात आली.

 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा 2003 कलम 5 व कलम 7 च्या अनुषंगाने बेकायदेशीररित्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पोलीस प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन तसेच आरोग्य विभाग यांना संयुक्तरित्या कार्य करण्याच्या  सूचना दिल्या. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय हे कार्यालयातील परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याकरिता कलम 4 च्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुख व कार्यालयीन प्रमुख यांची जिमेदारी राहील आणि  त्यानुषंगाने कार्यवाही करतील, असेही यावेळी डॉ.ओम्बासे म्हणाले. 

 तालुकास्तर आणि गावपातळीवर तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबविण्या करिता तालुकास्तरीय समन्वय समिती आणि गाव पातळीवरील समन्वय समिती स्थापन करण्याचे सूचनाही देण्यात आली. तालुकास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष हे गट विकास अधिकारी असतील, तर सदस्य सचिव हे तालुका आरोग्य अधिकारी, असतील तसेच ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथील कार्यरत दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, एनजीओ प्रतिनिधी आणि पोलीस उपनिरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक, मुख्याध्यापक गावातील  शाळेचे हे या समिती मधील सदस्य म्हणून कार्य करतील.

 गाव पातळीवरील समिती अंतर्गत सरपंच अध्यक्ष असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सदस्य सचिव असतील, गावातील  शाळेचे मुख्याध्यापक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदी सदस्य असतील.   वरील समितीतील सर्व सदस्य हे तंबाखू नियंत्रण कायदा च्या अनुषंगाने बैठक घेऊन गाव व तालुका मधील तंबाखू सेवनाच्या प्रमाण कमी करण्यास योग्य ती तंबाखू नियंत्रण कायदा 2003 च्या अनुषंगाने कार्यवाही आणि उपाय योजना करतील.

 या बैठकीस  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय अधीक्षक उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभाग या बैठकीत शहरातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख हे उपस्थित होते.


 
Top