परंडा / प्रतिनिधी - 

भूम तालुक्यातील आष्टावाडी येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था व युरोपियन युनियन यांच्या वतीने सोमवार दि.१२ रोजी भूम - परंडा - वाशी - कळंब या चार तालुक्याची मिळून प्रेमा गोपालन प्रोड्युसर कंपनी अंतर्गत व्हॅल्यु चैन व्यवसाय उभारणी करण्यात आली. 

त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हयात उस्मानाबादी शेळी प्रसिद्ध असल्यामुळे शेळी व्हॅल्यू चैन वर महिला कंपनी अंतर्गत वेगवेगळे व्यवसाय सुरु करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्या मध्ये शेळ्याना लागणारे पशुखाद्य निर्मिती , लेंडीखत निर्मिती , शेळ्यांना लागणारा विविध प्रकारचा चारा डेमो , किड नर्सरी म्हणजे कमी दरात छोटे शेळी पिल्लू विकत घेणे व मोठे करून त्यांची विक्री करणे असे व्यवसाय उभारणी करण्यात आली . व्यवसाय उभारणी चे उद्‌घाटन स्वयम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सीमा सय्यद हस्ते करण्यात आले.     यावेळी सीमा सय्यद यांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्रोड्युसर कंपनीच्या डायरेक्टर  पल्लवी माने , नौशाद शेख , अनपुर्णा ठोसर , वंदना माने , साधना जगदाळे यांच्यासह सभासद महिला उपस्थित होत्या .


 
Top