तुळजापूर/ प्रतिनिधी-
सैनिक फेडरेशन तालुका तुळजापूर तर्फे तुळजापूर -उस्मानाबाद पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विशेष सेवा पोलिस पदकाने गौरविल्याबद्दल सैनिक फेडरेशन जिल्हा उस्मानाबाद व सैनिक फेडरेशन तालुका तुळजापूर तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे , दादा खबोले , शिवलिंग कांबळे , महादेव ठोंबरे ,राम धुरगुडे ,विठ्ठल लोखंडे , सुर्यकांत भोजने ,ज्ञानदेव गुंड ,लक्ष्मण इंगळे व अनेक माजी सैनिक उपस्थित होते.