ठाकरे गट, भाजप, महाविकास आघाडीचा जल्लोष

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

: जिल्ह्यातील 165 ग्रामपंचयातीचे निकाल जाहीर झाला आहे.   अनेक मोठ्या गावांमध्ये अनपेक्षित निकाल लागले आहेत. सारोळा, तेर या आमदारांच्या गावांनी नेत्यांची प्रतिष्ठा राखली असून कसबे तडवळे, पाडोळी (आ.), मोहा येथे धक्‍कादायक निकाल लागले आहेत. दरम्यान, विजयी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष सुरु केला आहे.

 उस्मानाबाद तालुक्यातील कसबेतडवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांचा दारूण पराभव झाला आहे. तर उस्मानाबाद जिल्हयात ५० टक्के पेक्षा जास्त सरपंच भाजपाचे आल्याचा दावा भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मीडियाशी बोलताना केला.  तर शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हयातील ४९ ग्रामपंचायतवर एकहाथी सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडी म्हणुन जिल्हयात ७५ टक्के ग्रामपंचायतवर आमची सत्ता राहील, असा दावा निंबाळकर यांनी केला आहे. 

 या निवडणुकीत पाडोळी येथे भाजपला मोठा धक्का बसून गेल्या वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने या ठिकाणची सत्ता काबीज केली आहे. तर सारोळा येथे ही सत्ताधारी पार्टीला धक्का देत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन केली आहे. तेर येथे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ग्रामपंचायत राखली असून कांही जागेवर विरोधक यशस्वी झाले आहेत. तर ढोकी येथे काँग्रेस ने सत्ता स्थापन केली असून १२ जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत. विरोधकांना पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.आम आदमी पार्टीला ही तालुक्यातील एकमेव ग्रामंपचायत असलेल्या कावळेवाडी येथे आपली सत्ता कायम राखली आहे. भूम, परंडा तालुक्यात एकुण तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या. या तीन्ही ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेबांची शिवसेना यांना यश िमळाल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत या निवडणुकीत संमिश्र यश िमळाले आहे. 

 उस्मानाबाद तालुका -विजयी उमेदवार 

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे आमदार कैलास पाटील गटाचे (उद्धव ठाकरे गट)संपूर्ण पॅनल विजयी  तर   कामेगाव भाजपाचे सरपंचपदी वाघमारे, उपळा राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीच्या गटाचे सुहास घोगरे, गोपाळवाडी कोंबडवाडी ग्रामपंचायत निवडणूक भाजप सरपंच विजयी,  रुइभर ग्रामपंचायत निवडणूक भाजप सरपंच विजयी,  शिंगोली ग्रामपंचायत निवडणूक भाजप सरपंच विजयी, ढोकीत 17 जागेपैकी 12 काँग्रेस व सरपंच विजयी तर भाजप 5 जागा,  अंबेजवळगा ग्रामपंचायत निवडणूक भाजप सरपंच विजयी, ११ सदस्य विजयी,   कामेगाव भाजपाचे सरपंचपदी वाघमारे, खामसवाडी बाळासाहेबांची शिवसेना सरपंच अमोल पाटील विजयी,  शेकापूर शिंदे गटाचे सरपंच पदाचे किरण लगदिवे विजयी,किणी सरपंच पदाचे अंजली पाटील विजयी,तेर भाजप दहा जागा महाविकास आघाडी सात सरपंच भाजपचा विजयी,आम आदमी पार्टीचे अजित खोत कावळेवाडीचे सरपंच, वाखर वाडी ग्रामंचायत ठाकरे शिवसेना सरपंच सहित सर्व विजयी, गोरेवाडीचे नूतन सरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रीतम नाडे,

 कळंब तालुका -विजयी उमेदवार 

  कळंब तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे वाघोली साखरबाई काळे विजयी, मोहा भाजपचे सरपंच पदाचे संदीप मडके विजयी, आंदोरा सरपंच पदाचे उद्धव ठाकरे गटाचे बळवंत तांबारे विजयी, जुणोनी  येथे   उध्दव ठाकरे गटाचे अमोल अप्पा मुळे   सरपंच पदी विजयी, करंजकल्ला : उद्ववसेना 6, भाजप 3, सरपंच उद्ववसेना विजयी, कळंब लोहटा पुर्व ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा, मोहा : युवा परिवर्तन 16पैकी 16 जागा जिंकल्या,  लोहटा पुर्व ग्रामविकास पॅनलचे नूतन सरपंच ऋषी भिसे,   डिकसळ सरपंच पुष्पा धाकतोडे विजयी ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात 18 पैकी 18 जागेवर विजयी, तडवळा सरपंचपदी स्वाती विशाल जमाले, सुरेश पाटील यांचा पराभव, जुणोनी वलगुड झरेगाव ग्रुप ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे,


 
Top