उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भोपाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उस्मानाबाद रायफल शूटिंग क्लबचा चेतन हनुमंत सपकाळ याने विविध प्रकारात चमकदार कामगिरी करत एक सुवर्ण तर  दोन रौप्य पदकाची कमाई केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातुन राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा तो पहिला मानकरी ठरला आहे.

 भोपाळ येथे 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेत उस्मानाबाद रायफल शूटिंग क्लबच्या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. तर सोयबा सिद्दीकी ही स्पर्धेसाठी रवाना होत आहे. या स्पर्धेत उस्मानाबाद येथील चेतन हनुमंत सपकाळ याने 25 मीटर रेंज प्रकारात एक सुवर्ण पदक आणि 1 रौप्य तर 10 मीटर प्रकारात 1 रौप्य पदक अशी 3 पदके पटकावली आहेत.  उस्मानाबाद रायफल शूटिंग क्लबचे अध्यक्ष अजीम शेख यांचे त्यास मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल उस्मानाबाद रायफल शूटिंग क्लबचे मार्गदर्शक तौफिक सिद्दीकी,डॉ. दिग्गज दापके-देशमुख, सचिव शाहीन शेख, उपाध्यक्ष फेरोज पल्ला यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिकांनी सपकाळ याचे कौतुक केले आहे.


 
Top